यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातशासनाव्दारे जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी, मका) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात झाली असुन शेतकऱ्यांचा या भरडधान्य खरेदी उतम प्रतिसाद मिळत आहे.
२०२४-२५ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप)हंगाम भरडधान्य( ज्वारी ,मका ) खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे. शासकीय हमीभाव ज्वारी ३ हजार ३७१ आणि मका २ हजार २२५ प्रतिक्विंटलप्रमाणे दर लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु २०२४-२०२५खरीप हंगामाचा (ज्वारी / मका ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला . ऑनलाईन नोंदणीकरीता शेतकऱ्याचा प्रत्यक्ष LIVE फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. नोंदणी साठी त्वरीत संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कोरपावली तालुका यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे. त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी, तसेच बॅक अकाऊंट चालू स्थितीत तसेच पूर्ण अंकी असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी २५ डिसेंबर रोजी पर्यंत ऑनलाईन नोंदणी कोरपावली गावातील विकासो येथे करता येणार आहे.