जळगाव प्रतिनिधी । जी.एच.रायसोनी ॲल्युमनी फांउडेशन व जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयात आज पदवी व पदव्युत्तर शाखेतील माजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
अग्रवाल मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तरुणांनी करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील काळातील विविध उपक्रमाचे क्षणचित्रे चित्रफितीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना दाखविण्यात आले यावेळी उपस्थित माजी विध्यार्थ्यांच्या आठवणीना उजाळा मिळाला. या मेळाव्यात भारतातील विविध राज्यातील विध्यार्थ्यांसाहित आयर्लंड, युनायटेड किंग्डम्स, अब्रोड या विविध देशातील माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वय प्रा.तन्मय भाले व प्रा. सोनल पाटील यांनी केले. तर सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांना रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्यात.