दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन

जळगाव प्रतिनिधी । दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ठ करून शिधापत्रिका देण्यात यावी अशी मागणी संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज १६ डिसेंबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, २३ ऑगस्ट २०२० रोजी राज्य व केंद्र शसित प्रदेशांतना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व दिव्यांग बांधवांना अनुदानित धान्य देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने राज्य शासनाने कायद्याची अंमलबजावणी केली आहे. जिल्ह्यात बोगस अपंगाचा दाखला दावून विविध योजनांचा लाभ घेणाऱ्याची तपासणी करून योग्य कारवाई करावी. तसेच दिव्यांग व्यक्ती ही देशातील गरीब आणि समाजातील असुरक्षित घटक असल्यामुळे त्यांचा अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थीसाठी असलेल्या निकषापैकी दिव्यांग हा एक निकष समाविष्ठ करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग अथवा महिला, दिव्यांग बचत गटांच्या संस्थाना, स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देण्याचे यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

Protected Content