यावल प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘भूगोल दिन’ निमित्ताने ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून नांदेडच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे डॉ. वैजनाथ गंदगे यांनी ‘भूगोल’ या विषयाबद्दल व्याख्यान दिले तर अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी भूषविले
भूगोल विषय आजच्या काळाला किती महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी भूगोल दिनाचे आयोजन भूगोल विभागामार्फत करण्यात आलेले होते. डॉ. वैजनाथ गंदगे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व सांगून आपण भूगोल दिन का साजरा करतो ? भूगोल विषयाचा इतर विषयाची असणारा संबंध याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “भूगोल या विषयाची व्याप्ती सांगत पर्यावरणात भूगोलचे महत्व याविषयी सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख नरेंद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष कामडी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.ए.पी. पाटील, प्रा.संजय पाटील, डॉ. सुधीर कापडे, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा.दिलीप मोरे, प्रा. एस. आर.गायकवाड यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते