फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील व्यावसायिकाची ४३ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २३ मार्च रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनील अशोक जैन (वय-४८) रा. सराफ गल्ली फैजपूर ता.यावल यांचे आरसीसी पाईप सप्लायरचे दुकान आहे. २० मार्च रोजी सुनील जैन हे दुकानावर असताना त्यांना अनोळखी नंबरवरून रणदीप सिंग बोलत असल्याचे सांगत फोन आला. त्याने सांगितले की माझ्याकडे ९०० एमएमचे ५० पाईप जळगाव येथे पोहोच करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला औरंगाबाद सागर पाईप येथून पाईपांची उचल करून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे सांगितले. त्यानुसार सुनील जैन यांनी औरंगाबाद येथून पाइपची उचल करून जळगाव येथे कोल्हे जवळ जाण्यासाठी गेटपास लागते. त्यासाठी लागणारी रक्कम सुनील जैन यांच्याकडून संपर्क करून ऑनलाईन पध्दतीने ४३ हजार रुपयाची फसवूणक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुनील जैन यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार २३ मार्च रोजी रात्री उशिरा फैजपूर पोलीस ठाण्यात रणजित सिंह नाव्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.