मनपाच्या विशेष महासभेत ९७२ कोटी ४६ लाखांचा अर्थसंकल्प सादर  

आयुक्तांनी महापौरांकडे सादर केला १४ कोटी १ लाख शिलकीचा अर्थसंकल्प

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पाची विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या महासभेत मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी यांनी ९७२ कोटी ४६ लाखांचा तर १४ कोटी १ लाख शिलकीचा अर्थसंकल्प महापौरांकडे सादर केला.

जळगाव महानगर पालिकेच्या सन ‘२०२१-२२’ सालचे सुधारीत आणि सन ‘२०२२-२३’ सालचे मूमुळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी गुरुवार, दि.२४ मार्च रोजी  अर्थसंकल्पाची विशेष महासभा संपन्न झाली. यावेळी मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर या अर्थसंकल्पाबाबत सदस्यांना अभ्यास करण्यासाठी अर्थसंकल्पाची विशेष महासभा तहकूब करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. प्रारंभी आयुक्त कुलकर्णी यांनी मनपाचा अर्थसंकल्प महापौर महाजन यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आयुक्तांनी अर्थसंकल्पीय मनोगत व्यक्त करतांना जळगाव शहरातील वाढत्या समस्या व पायाभूत सुविधेवरचा ताण विचारात घेता, त्यावर मात करुन उपाय योजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त करत, महसुली उत्पन्नाच्या वसुलीवर भर देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर अर्थसंकल्पात विविध विकास कामांसाठी तरतुद करण्यात आल्याचे जाहीर केले.

विकास योजनेच्या आराखड्यासाठी दोन कोटींची तरतूद

जळगाव शहराच्या विकास योजनेची मुदत २०१३ मध्ये संपुष्टात आली असून, नव्याने आराखडा करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष विकास योजना तयार करण्याच्या कामास सुरुवात होणे अपेक्षित असून या कामासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मालमत्ता करातून ९० कोटी ५१ लाखांचे उत्पन्न अपेक्षित

मालमत्ता करापासून ५५  कोटी ५७  लाखांचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यात नव्याने करण्यात आलेल्या  ङ्गेर मुल्यांकनामुळे उत्पन्नात २५ कोटींची वाढ होणार असून, आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून ९०  कोटी ५९ लाख उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. दरम्यान, मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना राबविण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेतर्ङ्गे आकारण्यात येणार्‍या मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!