Home Cities जळगाव भाजपच्या विश्वकर्मा योजना सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संजय विसपुते यांची नियुक्ती

भाजपच्या विश्वकर्मा योजना सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संजय विसपुते यांची नियुक्ती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्याच्या विश्वकर्मा योजना सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बाबुराव विसपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. या नियुक्तीमुळे भाजपच्या संघटनात्मक बळकटीसह केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असल्याचे मानले जात आहे.

पक्ष संघटनेतील कार्य आणि जबाबदाऱ्यांचे यशस्वीपणे पालन केल्याबद्दल विसपुते यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत योजनांची पोहोच वाढविण्यासाठी त्यांच्याकडून सक्रिय भूमिका अपेक्षित आहे.

या नियुक्तीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री गिरीश महाजन, प्रदेश नेतृत्व तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करण्यात आला. पक्षविस्तार, संघटन मजबूत करणे आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विसपुते यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

संजय विसपुते यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या विश्वकर्मा योजना सेलला जिल्ह्यात अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 


Protected Content

Play sound