पाच लाखांसाठी पिंप्राळा येथील विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या आरती दिनेश शिरसाठ (वय-२७) यांच्या विवाह गुजरात राज्यातील सुरत येथील दिनेश देविदास शिरसाठ यांच्याशी मार्च-२०१७ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातचे काही महिने चांगले गेल्यानंतर पती दिनेश शिरसाठ याने घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, जेठ, जेठाणी, ननंद यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. अखेर मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात पती दिनेश देविदास शिरसाठ, सासू अलका देविदास शिरसाठ, जेठ रविंद्र देविदास शिरसाठ, जेठाणी करिष्मा रविंद्र शिरसाठ, नणंद पुष्पा देविदास शिरसाठ सर्व रा. सुरत गुजरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.

Protected Content