नोकरीचे आमिष दाखवून अडीच लाखांची फसवणूक : गुन्हा दाखल

शेंदूर्णी प्रतिनिधी । नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील के.के.नगर मधील रहिवाशी निवृत्त शिक्षक दत्तात्रय जोशी (वय ६९) यांच्या फिर्यादी वरून आज चरणसिंग सुरा नाईक रा. मालखेडा ता. जामनेर याचे विरुद्ध भा.द.वी.कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पहुर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांचे आदेशानुसार  पो.ना. ८७० किरण शिंपी हे करीत आहे. गुन्ह्याचा तपशील असा की आरोपी चरणसिंग सुरा राठोड याने २३/६/२०१० व २२/७/११ रोजी दुपारी १२.३० वाजता फिर्यादीचे राहते घरी के.के.नगर येथे साक्षीदार फिर्यादीचा मुलगा यास गट विकास अधिकारी या पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून अमिश दाखवले व फिर्यादी कडून २लाख ५० रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून भारतीय दंड संहिता१८६० चे कलम ४२० नुसार गुन्हा रजी नं.३३९/२०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content