ताबा सुटल्याने दुचाकीचा अपघात

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । वावडदा ते शिरसोली रोडवरील हॉटेल लयभारी समोर दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी खड्ड्यात गेल्या एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवारी ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वावडदा ते शिरसोली रोडवरून गौरव राजेंद्र साबळे वय १९ आणि सागर राजेंद्र साबळे दोन्ही रा. पळासखेडा ता. जामनेर हे दोघे दुचाकी एमएच १९ ईएफ ६४६३ ने दुचाकीने जात होते. त्यावेळी दुचाकी सागर साबळे हा चालवीत होता. यात रस्त्यावरील हॉटेल लयभारी समोरून जात असतांना सागरचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी खड्ड्याने गेल्याने गौरव साबळे हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ही घटना १ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. या अपघातातची चौकशीअंती गौरव साबळे यांनी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अखेर शुक्रवारी ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात सागर साबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास पोहेकॅा जितेंद्र राठोड हे करीत आहे.

Protected Content