चाळीसगाव शहरातून एकाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हिरापूर रोडवरील एका हॉटेलवरून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कुणाल राजेंद्र मिस्तरी (वय-२६) रा. सानेगुरूजी नगर, हिरापुर रोड चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गॅरेजचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १७ मे रोजी रात्री ८ वाजता कामाच्या निमित्ताने शहरातील हिरापूर रोडवरील हॉटेल जत्रा येथे दुचाकी (एमएच १९ डीबी ६२३७) ने आले होते. दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील करीत आहे.

Protected Content