जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमळा शिवारातील वाघुर धरणाजवळून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रईस शेख मुसा पिंजारी (वय-४८) रा. नशिराबाद ता. जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १९ जून रोजी दुपारी ८ वाजता ते उमाळा शिवारातील वाघूर धरणाजवळील झोपडीच्या बाजूला असलेल्या पंपाजवळ दुचाकीने आले. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १० सीके ६९६०) दुचाकी पार्क करून लावली होती. त्यानंतर वाघूर धरणावर ते भटकंती करण्यासाठी गेले.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी ५ वाजता ते धरणाजवळील झोपडीच्या बाजूला असलेल्या पंपाजवळ आले असता त्यांना त्यांची दुचाकी मिळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही आढळून न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेख रईस पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवार २२ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.