जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालाजी पेठ परिसरातून एकाची १७ हजार ५०० रूपये किंमतीची सायकल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय राधाकृष्ण मुंगड (वय-५५) रा. बालाजीपेठ , जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० जून रोजी त्यांनी त्यांची मालकीची १७ हजार ५०० रूपये किंमतीची सायकल पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सायकल चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी २१ जून रोजी उघडकीला आला आहे. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली असता त्यांना कुठेही सायकल मिळून आली नाही. बुधवारी २२ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक योगेश माळी करीत आहे.