जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रिधुरवाडा परिसरातून एकाची १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाकर हरीपद सांखी (वय-४१) रा. मातोश्री बिल्डींग रिधूरवाडा, शनीपेठ जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल (एमएच १९ एएच ७०००) ही घरासमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपयांची मोटारसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरातील मोटारसायकलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही. अखेर गुरूवार २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.