जळगाव प्रतिनिधी । शहरातील विद्यानगरातून अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेली ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील विद्या नगर परिसरात राहणारे दिपक वासुदेव फालक (वय-३५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे नोकरीवर जाण्यायेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ११०१ ) क्रमांकाची दुचाकी आहे. २३ जानेवारी रोजी रविवार असल्याने ते घरीच होते. त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोधाशोध केला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. शुक्रवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे