भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जाम मोहल्ला येथील मच्छी वाडी परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना, शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख मुजाहिद रहमत उल्ला (वय-४०) रा. जाम मोहल्ला, मच्छीवाडा भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएम ०५, एयू ३९०६) ही पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेले. हा प्रकार सकाळी ८.३० वाजता उघडलेला आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून नसल्याने अखेर दुपारी ४ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यासीन पिंजारी करीत आहे.