बकऱ्या चारण्यावरून एकाला बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील भरवस शिवारातील शेतात बकऱ्या चरणाच्या कारणावरून एका मजुराला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवार १८ जून रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार १९ जून रोजी मारवड पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भरवस गावात युवराज सेना भिल वय-५० हे व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकऱ्यांचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान १८ जून रोजी सकाळी ते त्यांच्या बकऱ्या घेऊन गायरान गट क्रमांक २८२ मध्ये बकऱ्या चारत होते. त्यावेळी रमेश देविदास मालचे रा. भरवस ता.अमळनेर याने युवराज भिल याला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर युवराज हा सकाळी ९.३० वाजता घरी आला असता गावात राहणारे रमेश देविदास मालचे, छोटीबाई रमेश मालचे, रवींद्र रमेश मालचे, प्रवीण रमेश मालाचे व त्याची पत्नी तसेच दिनेश रमेश मालचे, दिव्या रवींद्र मालचे, सरला छगन सोनवणे, उषा देविदास मालचे, ताऊ छगन सोनवणे, छगन सोनवणे, भुरा देविदास मालचे आणि सुरेश देविदास मालचे सर्व रा. भरवस ता. अमळनेर यांनी अश्लील शिवीगाळ करत युवराज भिल यांना बेदम मारहाण केली. तर एकाने त्यांच्या हातावर ब्लेडने वार करून दुखापत केली. दरम्यान या घटनेप्रकरणी युवराज भिल यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावेळी त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.

Protected Content