अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडा बसस्थानकाजवळ उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात लाकडी काठी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अनिल मोतीलाल महाले वय-३४, रा. जवखेडा ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता अनिल महाले हा गावातील बसस्थानकाजवळ असताना उधारीचे पैसे मागण्यावरून संशयित आरोपी मनोज आत्माराम पाटील, दादा आत्माराम पाटील आणि प्रमोद मधुकर पाटील सर्व रा. जवखेडा ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करून लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. दरम्यान जखमी झालेल्या तरुणाला अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मनोज आत्माराम पाटील, दादा आत्माराम पाटील आणि प्रमोद मधुकर पाटील या तिघांविरोधात विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.