जळगाव प्रतिनिधी । सहकारी औद्योगीक वसाहतीमधील कंपनीतली टाकी साफ करतांना तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार https://livetrends.news सहकारी औद्योगीक वसाहतीमधील टाकी साफ करतांना तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली या. यावल, दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) ही यातील तिन्ही मृतांची नावे आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तिघांना तपासून मृत घोषीत केले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हे तिन्ही कामगार सहकारी औद्योगीक वसाहतीतल्या समृध्दी केमिकल या कंपनीत https://livetrends.news कामाला होते. तीन दिवसांपासून कंपनी बंद होती. यामुळे येथील टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे तिन्ही कामगारांना सांगण्यात आले होते. यात पहिल्यांदा दिलीप गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते देखील यात अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.