मुक्ताईनगरातील प्रवर्तक चौकात एकावर चाकू हल्ला; तिघांना अटक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील प्रवर्तन चौकात एकावर एका इसमावर दारूच्या नशेत चौघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी घडली. जमावाकडून चौघांना बेदम मारहाण करून पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. 

शहरातील प्रवर्तन चौकात बुऱ्हाणपूर रोडवर असलेल्या पानटपरी दुकानावर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र काढण्याच्या प्रयत्ना असलेल्या चौघांना शेजारी राहणारे मोबाईल दुकान मालक सागर पाटील व त्याचे वडील ओंकार पाटील हे बाहेर येऊन वाद का करीत असे विचारताच चौघांनी दोघे पिता पुत्रांना बेदम मारहाण केली व धारदार शस्त्र काढून ते ओंकार पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर सपासप वार केले.यानंतर लागलीच प्रवर्तन चौकात येऊन भुसावळातील फरार नामचीन गुंड याचे नाव घेऊन रक्ताने माखलेल्या शस्त्र हातात घेऊन मुक्ताईनगर करांना सार्वजनिक शिवीगाळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करू लागले यामुळे शहरातील जमाव प्रचंड भडकला आणि चौघांना बेदम मारहाण केली . चौघेही नशेत असल्याने ते जमावाला चिथावणी देत होते.अशात पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.व जमावाला शांत केले . सदरील चौघांनी परिस्थिती पाहता पोलिसांनी देखील खाकी दाखवून चौघांना लाठी चा प्रसाद दिला .या गोंधळाचा फायदा घेत एक फरार झाला तर तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

भुसावाळतील नामचीन गुंडाचे नावाने पोलिसांना धमक्या

सदरील तिघे गुंड पोलिसांना भुसावळातील एका फरार गुंडाचे नावाने धमकी देऊन दहशत पसरविण्याचा धक्कादायक प्रकार करीत होते. तर एक आणखी नामचीन गुंड याचा मुक्ताईनगरात अवैध धंदे करण्याच्या उद्देशाने वावर वाढल्याने त्याच्या माध्यमातून हे मुक्ताईनगर आल्याचे कळते .सदरील गुन्हेगारी मुक्ताईनगरात हात पाय पसरवू शकते यामुळे पोलिसांनी वेळीच यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Protected Content