जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात रस्त्यावरील पाणी वाहत असल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ व मारहाण केली तर एकाच लोखंडी पेन्चिस डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाबुलाल खान गुलाब खान वय ४५ रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या घरासमोरून पाणी वाहत असल्याच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे जाकीर, बाबु, रूकय्या, त्यांची दोन्ही मुले आणि त्यांची बहिण शहनाज या सर्वांनी बाबुलाल खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली तर यातील जाकीर याने हातात लोखंडी पेन्चिस पकडून त्यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी बाबुलाल खान यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.