जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर परिसरातून एकाची १० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिलीप अशोक उमरे (वय-२९) रा. श्रीराम समर्थ कॉलनी, खोटे नगर हे खासगी नोकरी करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीडी ५४०३) क्रमांकाची दुचाकी आहे. २२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळाली नाही. याप्रकरणी दिलीप उमरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.