जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरून जळगावात येत असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने. दुचाकीवर एकजण जागीच ठार झाला तर दुचाकी गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी पाळधी गावानजीक घडली आहे.
अशोक भाऊजी बोरसे (वय-५०) रा. टाकरखेडा ता. जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अशोक बोरसे हे टाकरखेडा येथे एकटेच राहत होते. शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवार २० एप्रिल रोजी ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधी घेण्यासाठी दुपारी १२ वाजता घरातून निघाले. दरम्यान, पाळधीपर्यंत खासगी रिक्षाने आले. त्यानंतर पाळधी येथे पिंप्राळा हुडको येथील एक जण ओळखीचे भेटले (नाव गाव माहिती नाही) त्यांच्या दुचाकीवर बसून ते जळगावकडे निघाले. विद्यापीठ आणि पाळधी दरम्यान जळगावकडे येत असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्या धडकेत अशोक बोरसे हे जागीच ठार झाले तर दुचाकीवरील दुसरे व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. मयतावर जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.