बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

patil

 

जळगाव प्रतिनिधी । रास्ता ओलांडून पलीकडे दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज सायंकाळी ४.३० वाजता पाळधी बायपास येथे घडली. याबाबत पाळधी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुकूमचंद केशव पाटील (वय-५०) रा. खर्डी ता. चोपडा ह.मु. शिव कॉलनी हे विद्यापीठ जवळ असलेल्या आनंद गिरधारीलाल ओसवाल यांच्या शेतातून केळीची गाडी भरून पाळधी बायपास जवळ तोल काट्यावर वजन करून परत शेतात दुचाकी क्रमांक एमएच १९ पीपी १७५१ ने जात असताना भरधाव वेगाने येणारी धुळे-जळगाव बसने (क्रमांक एमएच 18 बीजी 2733) जोरदार धडक दिली. धडक देताच दुचाकीस्वार हुकुमचंद पाटील यांचा जागीच मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे हेल्मेट घातलेले असताना देखील डोक्याला मार बसला आहे.

कुटुंबियांचा आक्रोश

पाटील यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी, नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला आहे. त्यांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला आहे. पाटिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी हर्षाली, मुलगा राहुल असा परिवार आहे

Protected Content