जामनेर तालुक्यात दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू ; चार जखमी

WhatsApp Image 2019 10 11 at 6.45.42 PM

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी चिंचखेडे दरम्यान दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून चार तरुण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

नेरी चिंचखेडे दरम्यान दोन दुचाकींचा अपघात झाला असता यात सचिन सुभाष हिवरे (वय २८) (रा. केकतनिंभोरा) याचा जागीच मृत्यू झाला. निवृत्ती धाटे (वय २७) राहणार केकतनिंभोरा व हर्षल (भु-या) संजय सोनवणे (वय २०), दिपक पावरा (वय २३),विजय भंडारी (वय २३)तिघे राहणार पळासखेडे बुद्रुक असे ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आलेले आहे. हा अपघात हा दि.१० रोजी रात्री ९ – ४५ वाजेच्या सुमारास घडला असून सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये ८६/२०१९ नंबर प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन चौधरी करीत आहेत .मयत सचिन हा कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या जाण्याने हिवरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ६ महिन्याची मुलगी असा परिवार आहे.

Protected Content