कुर्‍हाड येथे रानडुक्करच्या हल्ल्यात एक जखमी (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हाड येथे रानडुक्करच्या हल्ल्यात एक सालदार जखमी झाला असून हिंस्र प्राण्यांपासून मजूरांचे रक्षण व्हावे, यासाठी वनविभागाने तात्काळ उपाय योजना करावी, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. 

पाचोरा तालुक्यातील मालखेडा फॉरेस्ट मध्ये जवळपास ३२७ हेक्टर चे जंगल असुन या भागातील शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांपासून खुप मोठे नुकसान सहन करुन शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर नेहमी  हिंस्र प्राण्यांचे नेहमी हल्ले होत असतात आज शिवसेना शेतकरीसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांच्या शेतातील सालदार जब्बार तडवी यांच्यावर आज रानडुक्करा ने हल्ला करुन त्यास जखमी केले. जखमीवर पाचोर्यात हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जखमीला भेटुन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. तालुक्यातील या जंगलाच्या लगत असलेल्या जवळपास ५०० हुन अधिक शेतकर्‍यांचे नुकसान नेहमी होत असते वनविभागाने आणि शासनाने याकडे लक्ष देवून कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

Protected Content