Home क्राईम कारवर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यु

कारवर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यु

0
67

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील मुळ रहिवासी असून नाशिक येथील शिक्षकाच्या कारवर वाळलेले झाड कोसळल्याने जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षक नितीन तायडे ( वय ३२) यांचे वलखेड (जि. नाशिक) फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेले वादळी वारा आणी पाऊसाच्या गोंधळात वाळलेले झाड त्यांच्या कारवर कोसळून झालेल्या विचित्र भिषण अपघातात त्यांचे दुदैवी निधन झाले. ते पिंपरूळ जिल्हा नाशिक येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, बहिण, मेहुणे असा परिवार आहे. त्यांचे मृतदेह नाशिकहुन त्यांच्या मुळ अट्रावल येथे आणण्यात आले व त्यांचे आज सकाळी अट्रावल तालुका यावल येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शिक्षक नितिन तायडे येथील बस आगारातील सेवानिवृत्त चालक सोमा तायडे यांचे पुत्र होत. तर अट्रावल मुंजोबा देवस्थान विश्वस्त समिती सदस्य दीपक तायडे यांचे बंधू होत. नितिन तायडे यांच्या अशा दुदैवी अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound