भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील आक्सा नगरात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीला २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता विजेचा शॉक लागला होता. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुरूवारी ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आयजुद्दीन कुतुबद्दिन वय-४८ रा. आक्सा नगर, वरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयजुद्दीन कुतुबद्दिन हे आपल्या कुटुंबासह वरणगाव येथील आक्सा नगरात वास्तव्याला होते. २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांना विजेचा शॉक लागला त्यामुळे नातेवाईकांना त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेबाबात गुरूवार ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे हे करीत आहे.