दुचाकी घसरून दुभाजकावर आदळल्याने एकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरुन दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्वत: मृत्यूस कारणीभूत असल्याने दुचाकीस्वाराविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.   चंदू रामलाल उघडे (४०, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यतील कासमपुरा येथील रहिवाशी असेलेले चंदू उघडे हे सध्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहत होते. २७ जून रोजी रात्री ते दुचाकी क्रमांक (एमएच १९, एसी ९६४१) ने कुसुंबा येथील घरी परतत असताना जळगाव तोलकाट्याजवळ एक वृद्ध रस्ता ओलांडत होता. त्याला वाचविण्यासाठी दुचाकीस्वार चंदू उघडे यांनी अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी पाऊसही पडत असल्याने दुचाकी घसरली व ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या सिमेंटच्या दुभाजकावर धडकली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्यने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने मयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Protected Content