पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळून ढिगारा रस्त्यावर आला आहे. तर काही दगडी येथील हॉटेल पिकनिक येथे कोसळल्याने एकाचा मृत्यू तर १ जण जखमी झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात काल पासून ५६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मावळ तालुक्यातील आदरवाडी गाव परिसरात काल रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील एका डोंगराचा कडा तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मी आहे. १० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रस्त्यावर पसरला आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी किमान ५-६ तास तरी लागणार आहे. यातील एक कडा हा पिकनिक हॉटेलमधील १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १ जखमी आहे.