रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तहसील कार्यालयात आडगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील तलाठी संतोष पवार यांची हत्या फेरफार प्रलंबित असल्याच्या कारणावरुन करण्यात आल्याच्या निषेधार्थ रावेर तालुका तलाठी संघाने एक दिवस काम बंद आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनात रावेर तालुक्यातील अनेक महसूल कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. मंडळ अधिकारी विठोबा पाटील, अनंत खवले, पुरवठा अधिकारी सरोदे मॅम, महसूल सहायक प्रविण पाटील, अव्वल कारकुंर सचिन पाटील, भूषण कांबळे, अजित टोंगळे, योगेश मोहीते, हर्षल पाटील, सुलेमान तडवी, तलाठी स्वप्नील परदेशी, गोपाल भगत, रवि शिंगने, दिपक गवई, गुंवतन बारेला, अंजुम तडवी, गुंजन तडवी, अंजुम कुरकुरे, के सी पाटील, एस ए घरडे, सुधीर खरात, प्रशांत तायडे, अविनाश ईगळे, आर आर तडवी, एम पी पाटील, वाय आय तडवी, एन आर चौधरी, प्रविण नारखेडे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
तलाठी संतोष पवार यांची निःपक्षपाती कामगिरी आणि शासकीय कामकाज करत असताना झालेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे तलाठी व महसूल कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येचा निषेध करत कामबंद आंदोलनाद्वारे सरकारकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.