मुळजी जेठा महाविद्यालयात ‘इतिहास लेखनातील संशोधन पध्दती’ एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे इतिहास लेखनातील संशोधन पद्धती या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन आज १५ मार्च रोजी करण्यात आले. या कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानव्यविद्या प्रशाळा प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे च्या इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी केले. या कार्यशाळेत एकुण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिले सत्र ‘कंप्यूटर एप्लीकेशन अँड युज ऑफ आयटी रिसोर्सेस इन हिस्टॉरिकल रीसर्च’ या विषयावर डॉ.श्रद्धा कुंभोजकर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात न्यू ट्रेन्ड्स इन फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.दिलीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या व समारोप सत्रात मुंबई विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.किशोर गायकवाड यांनी न्यू ट्रेन्डस इन ट्रायबल हिस्टोरिओग्राफी या विषयावर सखोल मांडणी केली. सदर कार्यशाळेत महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठ व महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि संशोधक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन डॉ. जुगलकिशोर दुबे यांनी केले. सदर कार्यशाळेमध्ये इतिहासलेखनातील अद्यायावत आणि नावीन्यपूर्ण संशोधन पद्धतींच्या बाबतीत संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

Protected Content