जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीने दुपारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत रतन लोखंडे (वय-४८) रा. गेंदालाल मील, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भागवत लोखंडे हे पत्नी व दोन मुलांसह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्याला आहे. पेंटर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या ते काही महिन्यांपासून घरीच होते. तर त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले हे हातमजूरी करतात. बुधवार ६ जुलै रोजी सकाळी घरातील सर्वजण कामाला निघून गेले. त्यामुळे भागवत लोखंडे हे घरी एकटेच होते. त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सोनार करीत आहे.