चाळीसगाव येथील लाचखोर कंत्राटी डॉक्टरला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । रूग्णावाहिकेच्या बिलावर सही व शिक्क्यासाठी ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला सोमवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील असून रूग्णवाहिकेचा व्यवसाय करतात. कोरोना काळात त्यांनी त्यांच्या दोन रूग्णवाहिका चाळीसगाव  येथील शासकीय रूग्णालयात भाडेतत्वावर लावलेले  होते. तक्रारदार यांनी ग्रामीण रूग्णालयात लावलेले दोन्ही रूग्णवाहिकेचे एकुण ४ लाख २१ हजार ९४० रूपयांची दोन बिले मंजूरीसाठी टाकले होते. दरम्यान बिलाची पडताळणी होवून त्रृटी असल्याने बिले टाकलेली बिले परत आली होती. त्यामुळे बिले मंजूर होण्यासाठी सही व शिक्का आणून देण्याच्या मोबादल्यात कत्राटी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद,

वय-३८ रा.घाट रोड,चौधरी वाडा,चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव याने ६० हजाराची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा रचून रंगेहात पकडले होते. आज २८ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयातील न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांची कामकाज पाहिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content