जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील अक्सानगर येथील एका प्रौढ व्यक्तीला चौघांनी विनाकारण लोखंडी रॉडसह चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत शेख साबीर जखमी झाले आहेत.
सविस्तर असे की, शेख साबीर अहमद खलीलोद्दीन वय ४५ रा. अक्सा नगर हे २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकी एम.एच.१९. डी.एन.०४१४ वरुन चुलतभाऊ शोएब शेख रियाज यांच्यासोबत नशीराबाद येथून अक्सानगर येथे घराकडे यत होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आदित्य कन्स्ट्रक्शनजवळ दोन दुचाकीवरुन आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी काही एक कारण नसतांना शेख साबीर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने हातावर मारहाण करुन दुखापत केली. तसेच शेख साबीर यांच्या सोबत असलेल्या त्यांचा चुलत भाऊ शोएब यालाही मारहाणीत मुक्काबार बसला आहे.
यादरम्यान चौघांनी शेख साबीर यांच्या दुचाकीचे दगडाने फोडून नुकसान केले. अशा शेख साबीर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोन दुचाकींवरील चार अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहेत.