दोन गावठी पिस्तूलासह एकाला अटक; रावेर पोलीसांची कारवाई

रावेर/जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द शिवारातील केळीच्या शेतातून १८ हजार रूपये किंमतीचे दोन गावठी पिस्तूलासह एकाला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द शिवारातील केळीच्या शेतात अनिल रामलाल बारेला यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी १८ मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे आणि पथकाने कारवाई करत सापळा रचून संशयित आरोपी अनिल बारेला याला अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीच्या पिस्टलसह मॅगझिन असा एकूण १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.