खोटे नगर परिसरातून कोयत्यासह एकाला अटक, दोघे फरार

जळगाव प्रतिनिधी । खोटे नगर परिसरातील हॉटेल राधिका समोर बेकायदेशीर हातात कोयता घेवून फिरत असतांना तालुका पोलीसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून २० इंचचा कोयता हस्तगत केला आहे. तालुका पोलीसात अर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, खोटे नगर परिसरातील हॉटेल राधिका समोर दुचाकीवर बसून बेकायदेशीर हातात कोयता घेवून तीन जण फिरत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीसांनी मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी २९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी रोहन मधुकर पराये (वय-२५) रा. केदारनाथ नगर पिंप्राळा याला अटक केली तर अक्षय उर्फ बाब्या परदेशी रा. रथ चौक आणि राहूल खवडे रा. खंडेराव नगर हे दोघे (एमएच १९ सीई ९०१४ ) क्रमांकाच्या दुचाकीवरून फरार झाले आहे. अटक केलेल्या रोहन पराये कडून २० इंचाचा कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष हाळनोर करीत आहे. 

Protected Content