पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील असलेल्या टोल प्लाझा उद्घाटनाच्या दिवशी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणात पारोळा पोलीसांनी एका संशयित आरोपीला धुळे येथून अटक करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील असलेल्या टोल प्लाझा उद्घाटनाच्या दिवशी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती. या आगीत टोल प्लाझाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तोडफोड व जाळपोळची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या अनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी चक्र फिरविले. पारोळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, अमरसिंग वसावे, सहायक फौजदार सुनील पवार, सुनिल हटकर, महेश पाटील यांचे पथक सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करत होते.
याबाबत मिळालेल्या गुप्त माहिती वरून यातील सोनू उर्फ प्रितेश ईश्वर गुजर (वय-२७) हा धुळे येथील गल्ली नंबर सहा येथील आपल्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. त्यास या पथकाने मध्यरात्री शिताफीने पकडले. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्यास अटक करण्यात आली. तर पोलिस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.