हिरापूर विकासोच्या चेअरमनपदी ७५ वर्षीय शांताबाई पाटील यांची बिनविरोध निवड

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची ची निवड आज करण्यात आली. यात चेअरमनपदी ७५ वर्षीय आजी शांताबाई लहू पाटील यांची तर उपचेअरमनपदी गुलाब गोबाजी पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. ७५ वर्षे वयाच्या आजीबाई चेअरमन झाल्यात हे विशेष मानले जात आहे व त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एच.पाटील यांनी काम पाहिले. यासाठी सचिव सुभाष पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक म्हणून जगन्नाथ सिताराम पाटील, कैलास श्रीपत पाटील, विश्वास श्रावण पाटील, गोविंद ताराचंद पाटील, जनाबाई बारकू पाटील, नारायण उखडू भिल, कल्पनाबाई जिजाबराव पाटील, पुंजू संतोष पाटील, योगेश हिम्मत पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ जिजाबराव काशिनाथ पाटील, लहू पाटील, मोतीलाल पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, प्रताप पाटील, पुंजू पाटील, बंटी पाटील, विश्वास पाटील, सुभाष पाटील, कुलदीप पाटील, यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने सदर निवडणूक ही बिनविरोध झाली. हिरापूर येथील नवनिर्वाचित विकास सोसायटीच्या चेअरमन शांताबाई लहू पाटील या माजी सरपंच दिनकर लहू पाटील यांच्या मातोश्री आहेत. संचालक मंडळ व गावकऱ्यांच्या मदतीने मला हे पद मिळाल्याचे शांताबाई यांनी सांगितले.

Protected Content