अडीच लाखाची लाच मागणाऱ्या उपविभागीय अभियंत्यासह एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील आदीवासी वसतीगृहाच्या बांधकामाचे जुने बिल काढण्यासाठी उपविभागिय अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना अडीच लाखांच्या लाचेच्या मागणी प्रकरणात लाचलुचपत विभागाने आज अटक केली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. 

तक्रारदार यांनी अमळनेर तालुक्यातील आदीवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. यासंदर्भात धुळे येथील बांधकाम कंपनीने करार करून घेतला आहे. आदीवासी वस्तीगृहाच्या बांधकामाच्या आतापर्यंतच्या दिलेल्या बिलाच्या मोबदल्यात संशयित आरोपी उपविभागिय अभियंता दिनेश पाटील आणि कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधीलकर यांनी दोन लाख ५८ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार दिली. ८ जून २०२० रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांची चौकशी केली असता दोघांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस कर्मचारी करीत आहे. 

 

Protected Content