मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील जुने गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 एप्रिल ते 6 मे या कालखंडामध्ये सामूहिक श्री गुरूचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने संपन्न झाला. दरबारामध्ये 24 तास साखळी पद्धतीने दोन सेवेकरी वीणा वादन दोन सेवेकरी स्वामी चरित्र वाचन दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ जप माळ सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महिला सेवेकरी संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत पुरुष सेविकाऱ्यांनी सेवा रुजू केली. ही या सात दिवसात रोज नित्य स्वाहाकार, गणेश याग ,मनोबोध याग श्री चंडी याग ,श्री स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग संपन्न झाली. व सत्य दत्त पूजन करून सांगता झाली.
6 मे रोजी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळा शोभायात्रा मिरवणूक शहरातून काढण्यात आली. ठीक ठिकाणी सडा समार्जन, रांगोळ्या जागोजागी पालखीचे पूजन आरती यामुळे अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक सेवेकरी हजर होते. सप्ताह काळात खा.रक्षाताई खडसे, आमदार श्री एकनाथराव खडसे, आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील व रोहिणीताई खडसे यांचे विविध राजकीय ,सामाजिक पदाधिकारी व मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला.
स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक श्रीगुरूचरित्र पारायण व अखंडनाम जप यज्ञ संपन्न
8 months ago
No Comments