जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जीएस मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
जळगाव शहरातील जीएस मैदानावर शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. हे भव्य रक्तादान शिबीर जळगाव शहरातील टायगर ग्रुप, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, शिवधर्म फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अष्टविनायक मित्र मंडळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि सेवा समर्पण फाउंडेशनच्यावतीने आणि रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक शिवप्रेमींनी रक्तदान देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. या शिबिराला प्रसंगी रेड प्लस ब्लड बँक यांचे डॉक्टर गायकवाड , अमोल शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील, नगरसेवक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/464619631976805