शिवजयंतीनिमित्त पाचोऱ्यात प्रथमच फडकवला न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते भगवा ध्वज

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शासकीय शिवजयंती निमित्त प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावण्यात आला.

यावेळी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, तात्कालीन नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे तालुका अध्यक्ष विकास पाटील, डॉ. स्वनिल पाटील, अॅड. राजेंद्र परदेशी, राजेंद्र भोसले, प्रा. शिवाजी शिंदे, एम. एस. पी. बिडकॉनचे संचालक मनोज पाटील, डॉ. अनिल देशमुख, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील, गणेश पाटील, मुकेश तुपे, मुकेश शिंदे, राहुल पाटील, सतिष चौधरी, नगरसेवक अशोक मोरे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, वसुली अधिकारी साईदास जाधव, दगडू मराठे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मोरे, गणेश चौबे सह अनेक मान्यवर युवक युवती, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते.

पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वावृढ पुतळ्यास माल्याअर्पण करुन जिजाऊ वंदनेनंतर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांचे हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला, यावेळी ढोल, ताशे, लेझीम पथक व फटाक्यांच्या आतिष बाजीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आमदार किशोर पाटील, मा. नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शहरप्रमुख किशोर बारावकर यांचे हस्ते शिवसेना कार्यालया जवळ शिवजयंती साजरी करण्यात आली. भडगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ,सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित शिवजयंती साजरी करण्यात आली.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची सायकल रॅली

पाचोरा येथील नगरपरीषदेच्या आरोग्य विभागामार्फत सायकल रॅली काढण्यात आली होती. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रकाश भोसले यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली, छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून रॅली निघाल्यावर तीचे विसर्जन भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले. रॅलीचे प्रतिनिधित्व आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी केले. रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, भारतीय जनता पक्षातर्फे शिवजयंती निमित्त तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचे नेतृत्वात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले शिवजयंती निमित्त संपूर्ण शहर भगवेमय झाले होते,

 

Protected Content