जळगावात होणार भरीत फेस्टीव्हल ! – ना. गुलाबराव पाटलांची घोषणा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । ज्या प्रमाणे विविध बाबींचे उत्सव होतात, त्याच प्रकारे जळगावात भरीत फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावात लवकरच भरीत फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान, यासोबत नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री व सर्व आमदारांसाठी भरीत पार्टी देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात वांगी आणि केळी ही पिके मुबलक प्रमाणात पिकत असतात. यामुळे यांच्यापासून भरीतासह अन्य नेमके कोणते पदार्थ तयार होतात याची माहिती ही जगापर्यंत पोहचवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा याबाबत ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3496859183728057/

Protected Content