महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरूवात !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील केवडेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सप्ताहाचे हे 16 वे वर्ष आहे. कै. बाळकृष्ण कुलकर्णी शास्त्री महाराज पहूरपेठ (श्री चैतन्य कानिफनाथ सेवाश्रम नेवासा) यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या सप्ताहात हभप श्री महादेव महाराज खडांगळे (निपाणा) भागवत धर्मप्रसार यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाचा कार्यक्रम:
शिवपुराण कथा: दररोज दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, काकड आरती: दररोज सकाळी 5 वाजता, हरिपाठ: दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्यानंतर कीर्तन कार्यक्रम: 19 फेब्रुवारी: ह.भ.प. दासगिरी महाराज (तोरणाळे), 20 फेब्रुवारी: ह.भ.प. भगवान महाराज (बुलढाणा), 21 फेब्रुवारी: ह.भ.प. पांडुरंग महाराज (छत्रपती संभाजी नगर), 22 फेब्रुवारी: ह.भ.प. रामदास महाराज (कन्नड), 23 फेब्रुवारी: ह.भ.प. हरिदास महाराज (अकोला), 24 फेब्रुवारी: ह.भ.प. अर्जुन महाराज (पिंपळगाव), 25 फेब्रुवारी: (दुपारी 1 ते 5) दिंडी सोहळा, (सायंकाळी) ह.भ.प. कृष्णा महाराज (वाकोद), 26 फेब्रुवारी: (सकाळी 7 ते 12) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पहूर रुद्र अभिषेक, (रात्री 7 ते 9) दीपोत्सव, (महाशिवरात्री) ह.भ.प. नारायण महाराज उधळीकर यांचे कीर्तन, 27 फेब्रुवारी: (सकाळी 10 ते 12) ह.भ.प. महादेव महाराज खडांगळे (निपाणा) यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद पहूरसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या शिवपुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर संस्थान पहूर पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content