गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने महर्षी व्यास मंदीरात महापुजा व दुग्धाभिषेकाचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरु पौर्णिमा निमित्ताने रविवारी येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्तांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ८वाजेला महर्षी व्यासांची महापुजा व दुग्धाभिषेक आयोजीत केली आहे. गुरूपोर्णिमा निमित्ताने जिल्ह्यातील हजारो भाविक महर्षींच्या चरणी लिन होण्यासाठी यावल येथील महर्षींच्या मंदिरात हजेरी लावतात.

अध्यात्मिक क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरेस अनन्य महत्त्व आहे या परंपरेत ‘ महर्षी व्यास ‘गुरूंच्या अग्रस्थानी आहेत महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते असे म्हणतात की ”व्यासोच्छीट जगत सर्व  ” ! ( अर्थात या पृथ्वीतलावरील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथम महर्षी व्यासांना होते. ) महर्षी  व्यास हे  गुरूंचे  प्रतिनिधी आहेत. त्यामुळे महर्षी व्यासांना गुरु परंपरेत श्रेष्ठ स्थान आहे. चार वेद ,अठरा पुराण व  महाभारत रचयीते   महर्षी व्यासांचे येथे भव्य मंदिर आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेस मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच परीसरात  यात्रेचे आयोजन केले जाते. या निमित्ताने मंदिर व परीसरात रोषणाई करण्यात आली आहे.

महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. चिरंजीवी महर्षी  व्यास आजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील  भाविकांची भावना आहे . महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीत व्यासांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस मोठ्या यात्रेयात्रेचे आयोजन केले जातें. महर्षी व्यासांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात.आणि महर्षींच्या चरणी लीन होतात.

गुरु पौर्णिमेनिमित्ताने यावल येथील महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ वाजेला महापूजेचे आयोजन करण्यात आले  असून ११ पासून महाप्रसाद वाटपास सुरुवात होईल. यानिमित्ताने मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  दिवसभर महाप्रसादाचे वाटप करणार आहेत.  भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महर्षी व्यास व श्रीराम मंदिर विश्वस्तांनी केले आहे.

Protected Content