जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टर दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून, ‘रीडिंग रूम’चे उद्घाटन करण्यात आले, तसेच विविध विभागांतील प्राध्यापक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
या रीडिंग रूमचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. चंद्रया कांते, डॉ. शिरीष, ज्योत्सना भिरूड, गोपाल भोळे आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, विविध विभागांतील प्राध्यापक डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, रुग्णांसाठी तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे ऑनलाइन उपस्थित राहून सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांप्रति आदरभाव ठेवून सेवा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात आरोग्य सेवा आणि शैक्षणिक वातावरणाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.