जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साहित्यरत्न लाकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंजूर केलेल्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नामदेव मोरे यांनी आज बुधवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २०२० मध्ये विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतू गेल्या दोनवर्षांपूर्वी घोषित केलेल्या योजनांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही.
येत्या १ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेला साहित्यरत्न पुरस्कार मुख्यमंत्री यांना परत करण्यात येईल. अशी संतप्त प्रतिक्रिया नामदेव मोरे यांनी दिली आहे. याप्रसंगी नामदेव मोरे, रमेश कांबळे, सुरेश आंबोरे, अशोक पारधी, तुळशीराम मगरे, सागर अंभोरे, विजय सपकाळे, प्रदीप बाविस्कर हे उपस्थित होते.