भजे गल्लीतून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकच्या बाजूला असलेल्या भजे गल्लीतून तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन भिका चौधरी (वय 38, रा. रामनगर, मेहरून जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १५ मे रोजी रात्री ८ वाजता सचिन चौधरी हा कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ बीएफ ८८४५) ने जळगाव शहरातील नवीन बसस्थानकच्या बाजूला असलेल्या भजे गल्लीत आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही, अखेर मंगळवार १६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.

Protected Content