लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या वृत्ताची दखल : तहसीलदारांनी बोलविली बैठक

रावेर, प्रतिनिधी । संजय गांधी निराधार योजनेच्या तब्बल १२०० प्रकरणे मंजूरीसाठी अखेर तहसीलदार यांना मुहर्त मिळाला असून त्यांनी दि. ७ ते दि. ९ या तिन दिवसा दरम्यान बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने प्रलंबित प्रकरणाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तहसीलदारांनी बैठकीचे आयोजन केले आहे.

तहसील कार्यालयात विविध योजनांचे प्रकरणे अनेक महीन्यांपासुन प्रलंबीत होते. यामुळे तालुक्यातील जेष्ठ नागरिक तहसील कार्यालयात चकरा होते. यासंबधित वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने प्रसिध्द करताच तहसीलदार यांनी योजनेसंदर्भात बैठक बोलवली आहे.  यामध्ये ऑगस्ट २०२० पासूनच्या प्रलंबीत प्रकरणांचा समावेश आहे. मार्च महिन्यानंतर तहसील कार्यालयात बैठक होवून पडताळणी करून प्रकरणे मंजूर केली जाणार असल्याचे संजय गांधी विभागा तर्फे सांगण्यात आले होते. तालुक्यातील वृद्ध, निराधार, गरीब व अपंग बांधवांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे. रावेर तालुक्यातील गरीब, निराधार, वृद्ध अपंग बांधवांनी विविध योजनेंर्तगत लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मागील ऑगस्ट २०२० पासूनचे विविध प्रलंबीत प्रकरणे आहे. जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत फक्त दोनशेच प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. परंतु, मागील वर्षापासुन सुमारे बाराशे विविध प्रकरणे प्रलंबित आहे. यामध्ये संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, अपंग बांधवांच्या विविध योजना प्रलंबीत आहे. बैठक घेण्यात उशीर होत झाल्याने वृद्धमध्ये नाराजीचा सुर होता. 

 

Protected Content